राजुरा विधानसभेतील पाच हजार महिला होणार उद्योजक
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- केंद्र व राज्य शासनाच्या पीएमईजीपी व सीएमईजीपी या योजनासह इतरही पायाभूत सुविधा अनुदानाच्या विविध योजना अंतर्गत राज्यातील प्रथमतः विदर्भातील अकरा जिल्ह्यातील विधानसभा निहाय प्रत्येक विधानसभेतील पाच हजार महिला ह्या उद्योजक बनणार असल्याची ग्वाही गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या विदर्भाच्या हेड तथा रिजनल मॅनेजर सौ.सीमाताई उईके यांनी आयोजित उद्योग कार्यशाळेला संबोधित करताना हजारोच्या संख्येत जमलेल्या महिला उद्योजकांना ग्वाही दिली.
गाव माझा उद्योग फाउंडेशनचे मुख्य सीएमडी पवन वानखेडे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील 12 लाख महिलांना उद्योजक बनविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 रोज रविवारला गाव माझा उद्योग फाउंडेशन राजुरा, बल्हारशाहा, अहेरी, गडचिरोली या चार विधानसभेची संयुक्त एक दिवसीय उद्योग कार्यशाळा गोंडपीपरी येथील वी तू नागापुरे डीएड कालेज येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उदघाटक तथा मुख्य मार्गदर्शक आरएम सीमाताई उईके, अध्यक्ष एआरएम जसवंत बहादूरे, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार राजकपूर भडके, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नथुजी गोडशेलवार, उपसरपंच संजय मेश्राम, राजुरा विधानसभा कार्डनेटर कांताताई भडके, सारिका कालर, घुग्गुसच्या गोडशेलवार ताई, सांगडे ताई आदींची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी सीमाताईनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांचे मार्मिकतेने ब्रेनवाश करून संपूर्ण प्रोजेक्ट महिलांसाठी अगदी आपलेसा करून घेतला. शासनाच्या अशा अनेक योजना आहेत की ज्या ग्रामीण भागातील महिला पर्यंत अजूनही पोहचल्या नाहीत. त्याच योजना शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या ग्रामीण भागातील महिलां पर्यंत कशा पोहचवता येतील या करिता आम्ही कटीबद्द झालो असून ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प घेत गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू केले आहे.
यावेळी जसवंत बहादूरे यांनी सुद्धा उदघाटकांच्या नंतरचा उर्वरित संपूर्ण भाग त्यांनी अगदी व्ह्र्दयातून स्पष्ट केला, इतर मान्यवरांनी दोन दोन मिनिटात आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. यावेळी प्रास्ताविकेतून भडके सरांनी सुद्धा कवी सुरेश भटांच्या चार ओळीतून महिलांची मने जिंकलीत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडचिरोलीच्या सीसी समीक्षा झाडे यांनी केले तर आभार राजुरा विधानसभा सीसी कुंदाताई कोंडेकर यांनी मानले. सदर कार्यशाळेला हजारोच्या संख्येनी महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीसी अनिता वाघमारे, दिपमाला झाडे, आम्रपाली कोसनकर, आश्लेषा चिडे, प्रतीक्षा रायपूरे, ढवस ताई, अनिता निमसरकर सह इतरांनी अथक परिश्रम घेतले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…