हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी भगत, प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, यू. के. रांगणकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत माहिती विषद करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.बी. भगत मुख्याध्यापक यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना “लोहपुरुष” कसे म्हणतात, हे पटवून दिले. तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे कसे योगदान आहे. याप्रमाणे माहिती विषद करून आदरांजली वाहिली.
यावेळी दिनांक 15 डिसेंबरलाच शाळेचे शिक्षक राजू वानखेडे यांचा वाढदिवस असल्याकारणाने, त्यांच्याकडून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आलीत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर वामनभाऊ बोबडे, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे व इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…