मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली नेफडो संस्थेने मागणी. झाडांवर लागलेले अनधिकृत बॅनर तात्काळ काढा.
संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 23 डिसेंबर:- राजुरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर आहे. राजुरा हे जुने निझामकालीन संस्थानातील असल्याने शहराची बरीचशी संरचना त्याप्रमाणे दिसून येते. या शहराला तेलंगाणा राज्यातून येणारे दोन मार्ग आहेत. त्यापैकी आसिफबाद, मंचेरीयाल कडून येणारा मार्ग हा जास्त वर्दळीचा आहे. या मार्गावर राजुरा हद्दीत कळूनिंबाची जवळपास शेकडो मोठे वृक्ष आजही डोलदारपणे उभी आहेत. विशेष म्हणजे हे वृक्ष निझामकालिन असून त्यांचे वय सत्तर ते अंशी वर्ष आहे. तसेच शहरात बस स्थानक, जिल्हा परिषद शाळा, बीएसएनएल कार्यालय, सोमेश्वर मंदिर, माता मंदिर आणि अन्य वार्डातही बरीच वड, पिंपळ, कळूनिंब व इतर प्रजातिची मोठी जुनी वृक्ष आहेत. अशा सर्व जुन्या वृक्षांना द महाराष्ट्र अर्बन एरिआस प्रोटेक्शन अँड प्रिवेशन ऑफ ट्री ऍक्ट १९७५ मधील १६ जुलै २०२१ च्या संशोधनानुसार या वृक्षांची गणना करून त्यांना हेरिटेज ट्री चा दर्जा मिळाल्यास भविष्यातील संभाव्य जुन्या वृक्षांची वृक्षतोड होण्यापासून वाचविण्यात येईल तसेच त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात महत्वाचे योगदान ठरेल.
सदर कायद्यातील तरतुदीनुसार व स्वच्छ राजुरा सुंदर राजुरा, हिरवेगार व पर्यावरण पूरक राजुरा शहर ठेवण्यासाठी राजुरा नगर परिषदेने ही संकल्पना तात्काळ राबविण्याची आवश्यकता आहे. तसेच शहरातील ग्रीन कव्हर कायम ठेवून ते वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी आणि शहारातील वृक्षांवर लागलेली अनधिकृत बॅनर तात्काळ काढून टाकावी तसेच यापुढे राजुरा शहरात वृक्षांवर बॅनर लावणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करावी अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुराच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना देण्यात आले. संदीप वानखेडे , प्रशासकीय अधिकारी नगर परिषद राजुरा यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, अनंत डोंगे, तालुका अध्यक्ष राजुरा, ऍड. शंतनू देशमुख, बबलू चव्हाण, युवा राज्याध्यक्ष, संगीता पाचघरे, महिला संघटिका, रवी बुटले, प्रथमेश कडुकर, राजुरा तालुका संघटक आदींची उपस्थिती होती.
बादल बेले, महाराष्ट्र अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
राजुरा शहराचे सौन्दर्य वाढविणारे हे जुने वृक्ष आहेत. अश्या जुन्या वृक्षांना हेरिटेज ट्री म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संरक्षण व संवर्धन करावे. तसेच वृक्षांवर अनधिकृतपणे ब्यानार लावलेले आहेत ते तात्काळ काढण्यात यावे आणि यापुढे असे वृक्षांवर ब्यानार लागल्यास संबंधीत व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…