गावात बॅनर लावत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे केली मागणी.
श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील गावात मूलभूत सुविधा नाहीत म्हणून संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याची घटना पाटोदा तालुक्यातून समोर आला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावात सर्वग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत.
खडकवाडी गावात कसल्याही सुविधा नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे आणि त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. एक हजार आठशे लोकसंख्या असलेल्या या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी लावला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावची सध्या चर्चा राज्यभर होत आहे.
खडकवाडी गावात विकास कामासाठी वस्तीसाठी अनेक योजना आल्या मात्र यावर मिळालेला पैसा सरपंच आणि इतर अधिकाऱ्यांनी तो उचलून गावात कोणताही विकास न करता ते विकास कामांचे पैसे त्यांनी लुटले असा खळबळ जनक आरोप या गावचे नागरिक करत आहेत. इतक्या वर्षापासून या गावात अनेक गोष्टींचा अभाव आहे या गोष्टी वारंवार तक्रारीच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर मांडूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आता गावकरी संतापले आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांनी चक्क गावच विक्रीला काढले आहे.
जिल्ह्यात हेच गाव नाही तर अनेक गाव असे आहेत ज्यात लोक राहतात. मात्र कोणत्याही सोईसुविधाविना या गावांमध्ये निवडणुका लढवल्या जातात. ग्रामपंचायतमध्ये सरपंच येतो सदस्य असतात मात्र विकास मात्र कागदोपत्रीच होतोय यासाठी जिल्हा प्रशासन हे उदासीन का असाही सवाल या माध्यमातून पुढे येत आहे. मात्र आता चक्क पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावातील नागरिकांनी ही अनोखी शक्कल लढवत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता गाव विक्री करण्याची मागणी केली आहे. आता यापुढे नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…