वैशाली गायकवाड, पुणे उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील भीम कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता येत असतात यावर्षी वीस लाखांहून अधिक आंबेडकरी जनता येणार असल्याच्या दृष्टीने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
भीमा कोरेगाव येथे महान अशा महार रेजिमेंटच्या विजय क्रांती दिनी विजयस्तभाला अभिवादन करण्याकरिता लाखो आंबेडकरी जनता येत असते त्यामुळे प्रशासनाने दि. 31 डिसेंबर आणि एक जानेवारीला सुमारे एक हजार बसेस, 110 एकरांवर वाहनतळ आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 8 हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
भीमा कोरेगाव येथील अभिवादन सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पीएमपीचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले उपस्थित होते.
पीएमपीच्या 1 हजार बसेस असणार उपलद्ध
पीएमपीकडून दि. 31 डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी सुमारे एक हजार 50 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार 31 डिसेंबरला 475 बस दोन शिफ्टमध्ये चालवल्या जातील. एक जानेवारीला 575 बस दोन्ही बाजूने चालविण्यात येणार आहेत. गाड्यांसाठी शिक्रापूर येथे पार्किंगच्या ठिकाणी 31 डिसेंबरला 1300 वाहक तर एक जानेवारीला सुमारे 1500 हजार वाहक, चालक तैनात असतील. पेरणे येथे पार्किंगला 31 डिसेंबरला 1100 तसेच एक जानेवारीला 1300 वाहक- चालक दोन शिफ्टमध्ये काम करतील. एनडीआरएफचे एक पथकही नेमले आहे. जिल्हा व शहर पोलिसांचे 8 हजार कर्मचारी व अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.
110 एकरांवर असणार पार्किंग व्यवस्था.
यावर्षी आंबेडकरी जनता मोठया प्रमाणावर येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गेल्यावर्षी सुमारे 17 लाख लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यानुसार 60 एकरांवर 16 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती. यावर्षी 20 लाखा पेक्षा जास्त जनता येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सुमारे 40 एकरांवर पार्किंग क्षेत्रात वाढ करून दोन्ही बाजूला 110 एकरांवर 34 वाहनतळ उभारले जाणार आहेत.
कोणत्या सुविधा असणार…
🔵यंदा पाण्याचे टँकर वाढवण्यात आले असून ही संख्या दीडशेने वाढली आहे.
🔵या ठिकाणी सुमारे दोन हजार शौचालये उभारण्यात आले असून सक्शन मशिन ठेवण्यात येणार आहेत.
🔵वैद्यकीय विभागाचे सुमारे 259 अधिकारी व कर्मचारी दोन्ही दिवशी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.
🔵 आपत्कालीन परिस्थितीत 108 क्रमांकाच्या 20 तर अन्य 30 अशा एकूण 50 रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…