महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भुवनेश्वर:- जेव्हा आपल्या पोटातून जन्म घेणारा आपलाच मुलगा नराधम बनून आपल्याच जन्मदात्या आईवर हात उगारतो तेव्हा त्या आईला काय वाटत असेल विचार पण करवत नाही. अशीच एक खळबळजनक घटना ओडिशात येथून समोर आली आहे, येथे एका नराधम मुलाने स्वतःच्या आईला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. ही घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ओडिशातील केउंझार जिल्ह्यात ही घटना घडली. शेतातून फुलकोबी तोडण्यासाठी एका महिलेला तिच्या मुलाने खांबाला बांधून मारहाण केली. एका ७० वर्षीय महिलेने आपल्या लहान मुलाच्या शेतातील फुलकोबी तोडून खाल्ल्याने वाद झाला आणि दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. वादानंतर मुलाने आपल्याच आईला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.
यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनाही महिलेच्या मुलाच्या रोषाला सामोरे जावे लागले. हा मुलगा गावकऱ्यांना धमकावत होता. मात्र, नंतर महिलेची सुटका करून उपचारासाठी वासुदेवपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्या मुलाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स - गाईड्स युनिट…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…