स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानचा उपक्रम.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- गत 20 वर्षापासून स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान नि:स्वार्थपणे संत वचन जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहे. या वर्षी सुध्दा 31 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत सांप्रदायिक कीर्तने, कथा, प्रवचन, भारुड अशा विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या. वतीने देण्यात आली. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव संपन्न होणार आहेत. बीडकर भाविकांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून अध्यात्मिक विचार अंगीकारावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
खटोड प्रतिष्ठानच्यावतीने मागील 20 वर्षापासून मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत अध्यात्मिक विचारांनी करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. आज पर्यंत महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील कीर्तनकारांनी आपली सेवा देत कीर्तनाच्या माध्यमातून सर्व संतांचे विचार बीडकरांपर्यंत पोहचवले आहेत. या महोत्सवाने बीडचे नाव राज्यभरात पोहचले. कीर्तनकारांबरोबरच देशपातळीवर कार्य करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, मंडळी यांनी या महोत्सवात उपस्थिती दर्शवून त्यांचे विचार व्यक्त करत अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधन केले.
खटोड प्रतिष्ठानने महोत्सवाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ निर्माण केली. त्याबरोबरच मुलींचा सामुदायिक नामकरण सोहळा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कॉपीमुक्तीची चळवळ या सारखे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमही प्रतिष्ठानने मागील 20 वर्षात राबवले. यातील अनेक उपक्रमांची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डने घेतली हे विशेष. तरुणांमध्ये अध्यात्मिक विचारांची रुजवणूक व्हावी आणि भारतीय संस्कृतीची मूल्य आणि परंपरा पुढेही अविरत सुरु रहाव्यात या उदात्त हेतूने विचारांचे गांभीर्य करण्या बरोबरच अध्यात्मिक विचारांची रुजवणूक करण्यासाठी हा महोत्सव संपन्न होत असून यंदा 31 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव संपन्न होणार आहेत. बीडकर भाविकांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून अध्यात्मिक विचार अंगीकारावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स - गाईड्स युनिट…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…