✒️रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई,दि.9सप्टेंबर:- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आयकर विभाग मोठ्या प्रमाणावर सक्रिय झलेचे दिसून येत आहे. कर चोरणाऱ्या आयकर विभागाची वक्रदुष्ट्री पडलेली आहे. आयकर विभागाच्या जोरदार मोहीमेमुळे अनेक कर चाराचे धागे दनानाले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
आज महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी आयकर खात्याने छापे टाकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यात 25 ऑगस्ट रोजी सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून केलेल्या कारवाईतून आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.
आयकर विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न आणि 100 कोटींपेक्षा जास्त बेनामी व्यवहार उघड झाला आहे. तसेच आयकर विभागाने 5 कोटींचा मुद्देमालही जप्त केला. सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यात आयकर विभागाने सर्च ऑपरेशन केलं होतं. यावेळी आयकर विभागाने हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त केली आहेत.
उत्पादन, रस्ते, बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय यासह वाळू उत्खनन, साखर उत्पादन यात गुंतवणूक असलेल्या 2 बड्या समूहांना दणका बसला आहे. यावेळी झालेल्या कारवाईत करचोरीच्या अनेक पद्धती उघड झाल्या आहेत. तसेच करोडोंची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली.
वैद्यकीय क्षेत्रातील आर्थिक अनागोंदीवरही आयकर खात्याची कुऱ्हाड टाकली. कर चोरांविरुद्ध आयकर खात्याने जोरदार मोहीम सुरू केली आहे. तर येत्या दिवसात, ही कारवाई अधिक आक्रमक पद्धतीने होणार आहे. यात अनेक बडे डॉक्टर्स, व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.
सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन चंद्रपुर:- येथून एक खळबळजनक घटना…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…
प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न. पल्लवी मेश्राम उपसंपादक…