प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहरात मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी महादेवपुरा मंदिरजवळ नाकाबंदी केली असता कार (एम.एच. १४ सी.के. ३६४८) भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी आरोपी इमरान याला अटक करून कारसह दारूसाठा जप्त करीत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नववर्षाच्या स्वागतसाठी अनेकांनी मद्यपार्टीचे आयोजन केले असले तरी नववर्षानिमित्त शहरात येणारा देशी विदेशी दारूसाठा उपविभागीय पोलिस पथकाने पकडला असून आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कारवाई २४ रोजी महादेवपुरा परिसरात करण्यात आली. याप्रकरणी कारसह तब्बल ८ लाख ५६ हजार २०० रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली. इमरान सत्तार शेख (३४, रा.महादेवपुरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बार मालक जयस्वालविरुद्ध गुन्हा दाखल..
आरोपी इमरान याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सांगितले की, दारूसाठा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून आणला असून बारमालक मुकेश जयस्वाल रा. कळंब याने मोकळ्या जागेवर आणून दिला. आरोपीने बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हा दारुबंदी असतानाही आरोपीला दारूचा पुरवठा केल्या प्रकरणी आरोपी मुकेश जयस्वाल रा. कळंब याला
आरोपी बनवत त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्धा जिल्हा दारुबंदी असल्याचे माहिती असतानाही यवतमाळ तसेच लगतच्या जिल्ह्यातून दारूसाठा पुरविला जातो. त्यामुळे अशा बारमालक आणि वाईन शॉपीचालकांवर देखील कठोर कारवाई करुन त्यांच्या वरही स्थानबद्धतेची कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परवेज खान, अमर लाखे, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख आदींनी कारवाई केली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…