नागपूर पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे कडून अभिनंदन व शुभेच्छा.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- ग्रामीण तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) ग्रामपंचायत मध्ये आज दि ०१ जानेवारीला पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील रामूजी ढोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
५ नोव्हेंबरला पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेस चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उईके (धुर्वे ) यांनी भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला एकतर्फी पराभूत करून सरपंच पद आपल्या कब्जात केले होते. सोबत गत दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात असलेल्या ९ सदस्यीय ग्रामपंचायत मध्ये सरपंचां सह ६ ग्रा पं सदस्य निवडून आणत राष्ट्रवादीचा गड सर करण्यात संजय चिकटे आपल्या उत्तम संघटन कौशल्यामुळे यशस्वी झाले.
जुन्या कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्याने आज दि ०१ जानेवारीला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेस चे सुनील ढोके यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. या उपसरपंच पदाच्या निवडणुकी करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ठाकरे साहेब हे होते.तर सचिव प्रणिता बकाल यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली.
यावेळी प्रामुख्याने नागपूर पं स सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे,सरपंच स्वाती शिवाजी उईकें (धुर्वे), ग्रा पं सदस्य दीपचंद कांबळे, कमलाबाई भोजने, लीना रावळे, मेघा फंड, दिपाली मसराम सह माजी पंचायत समिती सदस्य उर्मिला मिलमीले, माजी ग्रा.पं.सदस्य हरीश फंड, बंडू गोटे, कमलेश मून, देवकीताई इवनाते, सुधाताई डंभारे, योगेश नंदनवार, किशोर धुर्वे, राजेंद्र जीवतोडे, प्रकाश हांडे, किशोर मिलमिले, प्रशांत देवळे, अजय देशमुख, नंदू कुंभरे, रमेश झाकणेकर, रवींद्र निखाडे, सुरज नगराळे, नागेश उपरे, चरण काळे सचिन मुठावार, भास्कर मेहकुरे, देवेंद्र भोजने, गजानन ढोके, प्रकाश उपरे, बबलू डंभारे, पंकज मून, दिलीप फंड आदी प्रतिष्टीत गावकरी मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्व उपस्थितांनी सरपंच स्वाती उईके(धुर्वे) व उपसरपंच सुनील ढोके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…