प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.1:- जिल्हा क्षयरोग केंद्र व आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृध्दाश्रम येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी व आसीएमआरचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मातृसेवा संघ मातोश्री वृध्दाश्रमाच्या अध्यक्ष पुष्पमाला देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी ए.एस. खोब्रागडे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ. हेमंत पाटील, आरोग्य सहाय्यक सुमंत ढोबळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजू सोनटक्के, साधना कोसारे, वैभव मेघरे, आयसीएमआरचे डॉ.आरविंद प्रधान, सोनू नागवंशी, सतिश राऊत, मातोश्री वृध्दाश्रमाचे कर्मचारी उपस्थित होते.
या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम शिबिरात संशयित क्षयरुग्णांची तपासणी तसेच हॅन्ड डिजीटल एक्स-रे मशीनद्वारे वृध्दाचे डिजिटल एक्स-रे तपासणी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान क्षयरोगाबाबत लाभार्थ्यांना माहिती, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, निदान झाल्यानंतर दिले जाणारे उपचार याबाबत माहिती देण्यात आली. या सर्व आजाराचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी कळविले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…