हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे, या उद्देशाने बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (बीआरटीसी) तर्फे लोहारा येथे आयोजित 15 दिवसीय बांबू विणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रशिक्षण आपल्या दारी या बीआरटीसी च्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील 20 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
बाजारपेठेत असलेली बांबू मॅटची वाढती मागणी लक्षात घेता महिलांना विविध प्रकारचे बांबू मॅट तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा लाभ आवश्यक साधनसामुग्रीसह देण्यात आला. या प्रसंगी महिलांनी प्रशिक्षणातून तयार केलेल्या विविध बांबू मॅटची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. ज्यामधे जिल्ह्यातील विविध बांबू वस्तू उत्पादक व खरेदीदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून महिलांनी तयार केलेल्या विविध बांबू मॅटचे कौतुक केले.
अशा प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला. यावेळी सरपंच किरण चालखुरे, बीआरटीसी चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार, प्रशिक्षक किशोर गायकवाड, संतोष बजाईत, बांबू उद्योजक अन्नपूर्णा धूर्वे, अनिल दहागावकर, बांस कंपनी लोहाराचे ऐश्वर्य बांगडे आणि गावकरी उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…