उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- दिनांक ३ जाने २०२४ रोजी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने डाँ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांनी अतिशय उत्कृष्ट विचार मांडून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली त्यांचे विचार सुरू केली त्यांचे विचार समजासाठी प्रेरणा देणारे आहे असे विचार तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.
या कार्यक्रमाला यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे,अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, सुधाकर वानखेडे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तै उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहकर तालुका अध्यक्ष दुर्गादास अंभोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मेहकर शहर अध्यक्ष महादेव मोरे यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…