नितीन शिंदे, ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- अभिनय कट्टा म्हणजे ठाण्याचे सांस्कृतिक प्रवेशद्वार असे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दहा वर्षापूर्वी मांडलेले मत खऱ्या अर्थाने कृतीतून दिसून येतेय. रविवारी अभिनय कट्ट्याचा सहाशेवा कट्टा विविध कलाविष्कारांच्या सादरीकरणाने पार पडला. कट्ट्याची सुरुवात ज्येष्ठ लेखक डॉ र म शेजवलकर, रुक्मिणी कदम, अपर्णा पुराणिक, उपअधीक्षक नरेश नागोठकर, यांनी दीपप्रज्वलन केले. सध्या सर्वच एकांकिका स्पर्धांमध्ये गाजत असलेली एकांकिका एकूण पट एक चा प्रयोग सादर करण्यात आला. तीस तरुण कलाकार असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या परिस्थितीवर आधारित या एकांकिकेने उपस्थित रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.अन्विता पाटणकर हिने सुरुवातीला कथ्थक नृत्य सादर केले.
अभिनय कट्टा ते अमेरिका दौरा या प्रवासाबद्दलची अथर्व नाकती याची मुलाखत झाली. अभिनय कट्ट्या वरील अगदीच बालपणीपासुनचे अनेक अनुभव सांगत असताना कित्येक बालनाट्य, एकांकिका, प्रायोगिक नाटक, मालिका, जाहिराती,चित्रपट थेट व्यावसायिक नाटक हरवलेल्या पत्त्याचा बंगला व या नाटकासाठी केलेला अमेरिका , कॅनडाचा यशस्वी दौरा. हा संपूर्ण अथर्वचा प्रवास कधी डोळ्यात आसू तर कधी हसू आणणारा होता. उपस्थित प्रत्येकाने या मुलाखतीनंतर अथर्वच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे भरभरून कौतुक केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मानसी यादव व हर्षिता बिडवई या बालक पालक संस्कार वर्गातील लहान मुलींनी संदेश देणारे भारुड साजरे केले.दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी धर्मवीर चित्रपटातील अष्टमीच्या गाण्यावर नृत्य सादर करत रसिकांना आश्चर्यकारक सुखद अनुभव दिला.
महाराष्ट्राची लावण्यसम्राज्ञी माधुरी चव्हाणने लावणी सादर करून खऱ्या अर्थाने लावणीची श्रीमंती दाखवून दिली. अभिनय कट्ट्याच्या वाचक कट्ट्यवरील सदस्यांनी काव्य वाचन केले. बालक पालक संस्कार वर्गातील मुलांनी बालझुंबड या अभिनय कट्ट्याच्या गाण्यावर थिरकत धम्माल उडवून दिली.
अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी कट्ट्याच्या विक्रमी सहाशेव्या प्रयोगाबद्दल उपस्थित प्रत्येक कलाकाराचे,रसिक प्रेक्षकांचे, प्रसार माध्यमांचे व या प्रवासात ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केले अशा प्रत्येकाचे आभार मानले. विशेष करून ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या कट्ट्यासाठी सुरुवातीला सहकार्य केले व संस्थेच्या सुरुवातीपासून मार्गदर्शक असलेले आजचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे , श्री भास्कर पाटील यांचे आभार मानले.
प्रसंगी आमदार श्री संजय केळकर, माजी महापौर श्री नरेश म्हस्के, ठाणे वैभवचे संपादक श्री मिलिंद बल्लाळ , सप्रसिद्ध अभिनेता निरंजन कुलकर्णी यांनी अभिनय कट्ट्याच्या या यशस्वी प्रवासाला शुभेच्छा दिल्या. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी समस्त ठाणेकरांतर्फे अभिनय कट्ट्याचे संचालक व समाजसुधारक किरण नाकती यांच्या आजवरच्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल आभार मानले. संपूर्ण ठाण्यावर आपले मोठे उपकार आहेत असे उदगार अजित जोशी या ज्येष्ठ नागरिकांनी काढले. हे बोलताना आदित्य प्रतिष्ठान,ठाणे च्या माध्यमातून होत असलेले मागील पंचवीस वर्षापासूनचे कार्य, कोव्हिडं काळातील किरण नाकती यांचे जीवाची बाजी लावून केलेले काम, नौपाडा रक्षक म्हणून विभागाची सेवा, श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातून बालक पालक संस्कार वर्गाच्या माध्यमातून लहान मुलांवर केले जाणारे आज अतिशय गरजेचे असलेले संस्कार, दिव्यांग मुलांसाठी मागील नऊ वर्षे सातत्याने चालणारे दिव्यांग कला केंद्र, वाचक कट्टा, संगीत कट्टा, योग कट्टा, आरोग्य कट्टा हा केवळ समाजासाठी किरण नाकती यांचा अतिशय उर्जादायी व थक्क करणारा प्रवास सांगत या ज्येष्ठ नागरिकाने आमच्यासाठी नेहमीच आजच्या युगातील आधुनिक श्रावण बाळ असलेल्या किरण नाकतींचा आम्हाला सदैव अभिमान वाटतो हे सांगितले. या विक्रमी कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…
*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित* *मधुकर गोंगले, गडचिरोली…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भाजपाचे महामंत्री दिनेश वर्मा…