सिंहगड रोड पोलिस स्टेशन ची दमदार कामगिरी ! अॅटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस केली अटक

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २८/१२/२०२३ रोजी केंदार अपार्टमेंट रेणुका नगरी जवळ बडगाव बुद्रुक सिहगड रोड पुणे येथुन पार्किंगमधुन तीन चाकी अॅटो रिक्षा कोणी तरी अज्ञात चोरट्चाने चोरी करुन घेवुन गेले बाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुप्त बातमीदारांकडे तसेच सदर परिसरामधील सी.सी.टी.व्ही कॅमेरा फुटेजची पाहणी करुन अज्ञात आरोपीचा सखोल तपास करीत असताना दि.३०/१२/२०२३ रोजी राौ २२/०० वा. ते दि.३१/१२/२०२३ रोजी ०२:०० वा दरम्यान तपास पथकातील सहा पोलीस उप निरी आबा उत्तेकर, पोना ५७९१ वेगरे, पोशि ८६०० चव्हाण, पोशि १०५१० शेंडगे, पोशि ९१८३ ओलेकर, पोशि/९१९१ क्षीरसागर असे सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगडरोड पो. स्टे. पुणे यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना तपास पथकातील सहा पोलीस उप-निरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोड येथे काळी-पिवळी रिक्षा घेवुन त्यामध्ये बसलेला आहे, सदरची रिक्षा ही त्याने चोरी केली असल्याची अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खातरजमा करून योग्य ती कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सपोनि सचिन निकम यांनी सोबतच्या अंमलदार यांच्या मदतीने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाता एक इसम काळ्या-पिवळ्या रिक्षामध्ये ड्रायव्हर सीटवरुन निघुन जाण्याचे तयारीत असताना दिसला त्यास वरील स्टाफच्या मदतीने दि.३१/१२/२०२३ रोजी रात्री ००/३० वा जागीच पकडुन त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विशाल युवराज राऊत वय-१९ वर्षे रा. मु. पो. अंत्रोली ता. वेल्हा जि. पुणे असे सांगितले. त्यांच्याकडे त्याचे ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच/१२/एनडब्ल्यु/९६२२ हीचे कागदपत्र व लायसन्सबाबत विचारता तो काही न बोलता तसाच शांत उभा राहिल्याने त्याच्याकडे पुन्हा सदर रिक्षाबाबत विचारणा करता त्याने सदरची रिक्षा ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याच्याकडे अटक मुदतीत अधिक तपास करता त्याने कात्रज चौक, सर्प उद्यान कात्रज पुणे या ठिकाणाहुन तीन चाकी रिक्षा चोरी केल्याचे सांगुन त्याच्याकडुन एकुण २,५५,०००/- रुपये किंमतीच्या तीन अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील अधिक तपास गणेश मोकाशी पोलीस उप निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत. अटक आरोपी याचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

१. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ६३१/२०२३ मा दं वि कलम ३७९
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ८३४/२०२३ मा दं वि कलम ३७९
३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ८४९/२०२३ मा दं वि कलम ३७९

सदरची कामगिरी मा. संभाजी कदम सो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, श्री. अप्पासाहेब शेवाळे सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री. अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयंत राजुरकर सोो. पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांचे पथकाने केली.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

सावनेर येथे गणपती मूर्ती खरेदीवर लकी ड्रॉ चा वर्षाव.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…

7 hours ago

शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती हेच माझे ध्येय: ऍड. संजय धोटे राजुरा मुक्तीसंग्राम दिन प्रतिपादन.

क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

8 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावासाच्या निमित्त धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…

8 hours ago

ब्रिलीअंट सीबीएसई स्कूल हिंगणघाट येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…

8 hours ago

गडचिरोली: ऊसाच्या शेतात जिवंत विद्युत प्रवाह साेडलेला तारांना स्पर्श झाल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…

8 hours ago