दीक्षाभूमी देसाईगंज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- सम्यक जागृत बौध्द महिला समिती देसाईगंज यांच्या विद्यमाने साजरा करण्यात आले आहे . पाहुण्यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली देऊन सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले. प्रमुख अतिथी छत्रपती बगमारे व आरती पुराम (सामाजिक कार्यकर्ते) यांनी आरोग्य प्रबोधिनी यांच्या विद्यमाने आधार प्रकल्प अंतर्गत विधवा महिलांच्या कौशल्य उपक्रमाची माहिती व व्यसनमुक्ती बद्दल प्रबोधन केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. विद्या गेडाम वैद्यकीय अधिकारी पी.एच.सी. देसाईगंज यांनी सावित्रीबाईंनी त्यांच्या काळात स्त्री शिक्षणासाठी खूप त्रास सहन केला त्यामुळेच आज अनेक स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना घोंगडे, संचालन ममता रामटेके तर आभार सरिता बारसागडे यांनी केले.
याप्रसंगी मोठ्या मुली व स्त्रियां करिता “दोन शब्द साऊसाठी” व लहान मुला मुलीं करिता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेषभूषा ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी अनेक बाल उपासक उपासिका व महिलांनी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता मेश्राम, श्यामला राऊत, ममता जांभूळकर, प्रतिभा बडोले, गायत्री वाहणे, लीना पाटील, रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम, मंदा शिंपोलकर, प्रतिमा शेंडे व साक्षी धनविजय यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…