प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) तालुक्या येथील माता मंदिर परिसरात मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्याच्या आरोपाखाली प्रीतम सहारे यास अमानुष मारहाण करून त्याची अर्धनग्न धिंड काढली होती. प्रितमवर करण्यात आलेले आरोप खोटे असून धिंड काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. प्रीतम सहारे यांच्या समर्थनार्थ, पोलिस प्रशासनाच्या निष्क्रीयते विरोधात बुधवारी रात्री सिंदी पोलिस ठाण्यावर नागरिकांनी मोर्चा काढला.
प्रीतम सहारे हे मागील 12 वर्षांपासून सिंदी शहरात वास्तव्यास आहेत. एक ते दीड वर्षांपासून पत्नी व दोन लहान मुलांबरोबर बेघरवस्तीमध्ये कांबळे यांच्या घरी किरायाने राहतात. त्यांची वर्तणूक प्रभागात समाजाप्रती तसेच शहरात चांगल्या प्रतीची आहे. त्यांना कधीही वार्डात भांडण-तंटा करताना नागरिकांनी पाहिले नाही. 29 डिसेंम्बर 2023 रोजी नंदा नदीजवळ माता मंदिर परिसरात मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्याप्रकरणी सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. महिन्यापासून मुलींची छेड काढत अश्लील चाळे केल्याचा आरोप प्रीतम सहारे वर करण्यात आला आहे. परंतु, त्याप्रकरणी मुलींची, पालकांची तसेच शिक्षकांची सिंदी पोलिसात तक्रार नाही.
विशेष म्हणजे घटनेसंदर्भात आरोपी विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतांना प्रीतम सहारे याला सकाळी स्टेशन परिसरातून प्रदीप कनोजे याने पकडून शाळेच्या आवारात आणून नागरिकांनी त्यास कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. एवढेच नाही तर त्याची शहरात धिंड काढली. या घटनेचा व मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. पोलिसांनी आरोपीला अमानुष मारहाण करून अर्धनग्न धिंड काढणाऱ्या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई न केल्याने बुधवारी सायंकाळी 7 वाजता गजानन पोईनकर व सचिन पेटकर यांच्या नेतृत्वात शहराच्या मुख्य मार्गाने पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यात जवळपास एक हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान, यावेळी पाच लोकांचे शिष्टमंडळ आतमध्ये जाऊन पोलिस निरीक्षक वंदना सोनवणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी 181 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले
अन्यथा तीव्र आंदोलन उभारू: मुलींची छेड काढून अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रीतम सहारे याला अटक केली. परंतु, या प्रकरणी मुलींची, पालकांची तसेच शिक्षकांची सिंदी पोलिसात तक्रार नाही. शहरातील काही गावपुढाऱ्यांनी येणाऱ्या स्थानिक नगर पालिकाच्या निवडणुकीवर डोळा ठेवून प्रभागात स्वतःची छबी चमकविण्याकरिता रचलेला कट आहे.
कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण करून शहरात अर्धनग्न धिंड काढणाऱ्या आरोपींवर अद्यापही सिंदी पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही . पोलिसांनी याची निष्पक्ष चौकशी करून 8 जानेवारीपर्यंत दोषी आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावे,अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. सचिन पेटकर, सामाजिक कार्यकर्ते, सिंदी (रेल्वे)
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…