यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जनतेला न्याय देण्यासाठी शासनाने प्रशासनिक अधिकाऱ्याची नियुक्ती केली. पण ते अधिकारी आयकत नसेल तर न्याय मागायचा तरी कुठे? त्यामुळे यवतमाळ जिल्हात एका शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्याने तहसीलदार यांच्या कक्षात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
गौतम गेडे रा. जवळा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौतम यांची जवळा येथे शेती आहे. त्यांच्या शेताजवळून वाहत असलेल्या नाल्याचा मार्ग बदलल्याने पुराचे पाणी शेतात येऊ लागले. यंदा तर शेतजमीन खरडून गेली. प्रचंड नुकसानीमुळे उद्ध्वस्त झालेल्या गौतम यांनी पुरामुळे आपले नुकसान थांबविण्यासाठी नाल्याचा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी आर्णीचे तहसीलदार परसराम भोसले यांच्याकडे केली. आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार तहसील कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. तक्रारीची दखल कुणीही न घेतल्याने दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या कक्षात विषप्राशन केले.
गौतम गेडे या शेतकऱ्याने वारंवार विनंती करून न्याय मिळत नसल्याने शेतकर्याने आर्णी तहसीलदार परशराम भोसले यांच्या कक्षात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदारांनी शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले. आर्णी तहसील प्रशासनाच्या या कारभाराविरोधात सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गौतम गेडे रा. जवळा, ता. आर्णी असे विष प्राशन करणाऱ्या शेतकर्याचे नाव आहे.
शेतकरी असलेले गौतम गेडे त्यांनी नववर्षच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2024 रोजी आर्णी तहसीलदार परशराम भोसले यांच्या कक्षात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदार भोसले यांनी आर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
यावर आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी संताप व्यक्त केला. अधिकार्यांनी शेतकर्यांशी सन्मानाने वागावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकार्यांनी शेतकर्याची बाजू घेतली असती तर, ही वेळ आली नसती. आता अधिकार्यांनी पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
आर्णीच्या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गौतम गेडे यांनी भगिनी श्वेता डेरे यांनी केली आहे. तहसीलदारांची बदली करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी दिला आहे. प्रशासकीय कामकाजाचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना बसत आहे. राज्यसरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. विषप्रकरणावरून जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटत आहे. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही याप्रकरणी तहसीलदार भोसले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…