शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांना धनादेश सुपूर्द
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होत असल्याचे समाधान- डॉ.श्रीकांत शिंदे
नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीने देणगी देण्यात आली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांना सुपूर्द करण्यात आला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज अयोध्येला जाऊन चंपत राय यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने हा धनादेश त्याना देण्यात आला.
यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, आज संपूर्ण महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला ११ कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगितले. अयोध्येत राम मंदिर व्हावे हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते कायम म्हणायचे की जर मी पंतप्रधान झालो तर काश्मिरातून कलम ३७० हटवेन आणि अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे काम करेन. स्वर्गीय बाळासाहेबांचे तेच स्वप्न आता पूर्ण होते आहे. त्यामुळे प्रभू श्री राम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांना मंदिर उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीराम मंदिराचे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले. अनेक शिवसैनिकानी रामजन्मभूमी आंदोलनावेळी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या सर्वांनी मिळून पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत असून अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर तब्बल पाचशे वर्षानंतर उभे राहते आहे. या मंदिराचे उद्घाटन येत्या २२ जानेवारी रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते होते असून या कामात शिवसेनेचाही खारीचा वाटा असावा या हेतूने हा धनादेश देण्यात आला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण असून आजच्या पिढीला आणि भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रभू श्री रामाचे अयोध्येत जाऊन दर्शन घेता येईल याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या वतीने अयोध्येला गेलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, समन्वयक आशिष कुलकर्णी तसेच पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांचा समावेश होता.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…