श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आज कोण कशा प्रकारे कुणाची फसवणूक करू शकतो याचा काही नेम नाही. अशीच एक फसवणुकीची घटना बीड येथून समोर आली आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून बीडमधील केसोना ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉ. विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर यांची ५७ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. विठ्ठल क्षीरसागर हे नोव्हेंबर महिन्यात सोशल मार्केटिंग साईट पहात होते. यातील एका साईटवर त्यांनी रिप्लाय दिला. त्यावरून त्यांना टेलीग्राम आयडी देऊन त्यावर बोलण्यास सांगितले. पाच ते सात दिवस समोरील व्यक्ती अर्पिता मोनिका (रा. बंगलोर) हिच्याशी मेसेजवर बोलणे झाले. यावेळी तिने आपण फॉरेक्स ट्रेडिंगसाठी इच्छुक आहात का? असा सवाल केला. यावर डॉ. क्षीरसागर यांनी होकार दिला. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली. १० नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी ४० हजार रूपये गुंतवणूक केली. त्याचे १५ नोव्हेंबरला ४५ हजार २०० रूपये नफा स्वरूपात मिळाले. त्यामुळे यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. ५७ लाख २० हजार रूपये गुंतवणूक झाल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला ३६ लाख रूपये टॅक्स बसला आहे. तो भरा, असे सांगितले. परंतु डॉ. क्षीरसागर यांनी हे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा, असा आग्रह धरला. त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दुर्वा बेले ने दिली शाळेला स्वामी विवेकानंद यांची फोटो प्रतिमा भेट. स्काऊट्स - गाईड्स युनिट…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट…
भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…