उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- जिल्हातील मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले असून आदेशानंतर ही अधिकाऱ्यांनी ते हटविले नाही. त्या अधिकारी व एमआयडीसी भुखंड हडप करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. शहरातील बोगस मिटाई दुकानदारांवरती तत्काळ कार्यवाही करावी, अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावे. नगरपरिषद समोरील अतिक्रमण हटवुन झाडे लावण्याचे काम सुरू करावे. येथील पोलिस वसाहतीचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची जे जे एन्ड सन्स व नापतोल या दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता, दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.
आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर संदीप गवई, गौतम नरवाडे, कुणाल माने, संदीप राऊत, दुर्गादास आंभोरे, राधेशाम खरात, देवानंद अवसरमोल, महादेव मोरे, शुभम नरवाडे, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी कस्तुरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणास बसले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…