राष्ट्रसंत तुकडोजीच्या संकल्पनेतून गाव विकास करण्याचे आमचे ध्येय: अँड सुधीर कोठारी यांचे प्रतिपादन.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- “गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संकल्पना साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून गावातील गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी पाचशे लोकांच्या भोजनाचे व स्वयंपाकाचे साहित्य हिंगणघाट बाजार समिती द्वारे देऊन ते गरजूंना विनामूल्य देण्यात येऊन जनतेचे जनतेला अर्पण या भावनेने आम्ही हा निर्णय घेऊन गाव सक्षम करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून ग्रामीण जनतेच्या हितासाठी जे जे योग्य आहे ते करण्याचा निर्धार जेष्ठ सहकार नेते अँड सुधीर कोठारी यांनी केला.
आपल्या उदबोधनात ॲड. सुधीर कोठारी पुढे म्हणाले की, या आजंती ग्रामपंचायतीने एक कोटी रुपये खर्च करून विविध कार्यक्रम व लग्न कार्यासाठी भवन बांधले असून ते केवळ एक हजार रुपयात भांडे व इलेक्ट्रिक सह गरजूना देण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमा सोबतच या ग्राम पंचायतचे 2008 मध्ये कर वसुलीचे उत्पन्न केवळ तीन लाख रुपये होते ते आज चाळीस लाखापर्यत पोहचले आहे. यासाठी त्यांनी आजंती ग्राम पंचायतीचे अभिनंदन केले.
अँड. सुधीर कोठारी हे 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत कचरा कुंडी वाटप व घंटा गाडीचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट कडून 500 लोकांच्या भोजनाचे व स्वयंपाकाचे साहित्याचे हस्तातरण व सामान्य फ़ंडातून ग्राम पंचायत निधी मधून 58 लाख रुपये विकास कामचे भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमात आज बुधवार,दि 10 जानेवारीला ग्रामपंचायत भवन आजंतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, माजी पंचायत समिती सभापती संजय तपासे, बाजार समितीचे माजी संचालक राजेश कोचर, आजंती तंटामुक्ती चे अध्यक्ष पुंडलिकराव गलांडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष दिगंबरराव चांभारे, उपाध्यक्ष राजु भोरे, वाघोली सरपंच खोडनकर हे उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय तपासे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम पंचायतीचे सदस्य राजेश कोचर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून या ग्राम पंचायतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अँड. सुधीर कोठारी यांचे कुशल मार्गदर्शनामुळे या ग्रामपंचायतीने न भूतो न भविष्यती अशी प्रगती केली असून त्यांच्याच नेतृत्वात आम्ही अधिक वेगाने प्रगती करू असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे संचालन दीपक माडे यांनी केले.
कार्यक्रमाला सरपंच सौ.सीमाताई देवढे, उपसरपंच मारोती ढगे, ग्राम पंचायत सदस्य रवि मानकर, प्रितम कुमरे, सौ.प्रणिता तपासे, सौ.मनिषा गेडाम, सौ. त्रिशला कळमकर, अर्चना कोल्हे, सौ. सविता नारायने, श्रीमती मायाताई आत्राम, प्रमोद बावनकर, ग्राम विकास अधिकारी व मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…