संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मुंबई येथे हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम या विषयावर दि. 9 जानेवारी 2024 रोजी कॉन्फ्रेंसचे आयोजन करण्यात आले होते. यात देश विदेशातील अनेक तज्ञाचे देशातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी, गोदरेज, महिंद्रा यांचे सह भारत सरकार व राज्य शासनाचे सचिव उपस्थीत होते.
यावेळी सर्व तज्ञ यांनी हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम या विषयावर महत्वाचे मार्गदर्शन केले यात आज समस्त मानवजातीपुढे हवामान बदलाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जागतिक तापमान आधीच एक अंशाने वाढले आहे. मागील अनेक वर्षांत सर्वाधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सुरू आहे. त्यामुळे तापमान वाढीचे आगामी काळात गंभीर परिणाम संपूर्ण मानव जातीला भोगावे लागेल. यासाठी आतापासून यावर उपयोजना करणे गरजेचे झाले आहे.
या महत्वपूर्ण हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम या कॉन्फ्रेंसचे मध्ये चंद्रपूर जिल्हयातुन वैनगंगा व्हॅलीचे उपाध्यक्ष आबिद अली यांचे सह संचालक बंडुजी डाखरे, लक्ष्मण घुगूल, गणेश वाभिटकर, डॉ. नितेश पावडे, खरडकर, दिलीप फुलबांधे, शंकर ठावरी चंद्रपूर जिल्ह्यातील 9 तालुक्याचे प्रतिनिधि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी या कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेऊन चंद्रपूर जिल्हात हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम याबद्दल काय उपयोजना करू शकतो याबाबत माहिती जाणून घेतली.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर…
*नवंदांपत्यास वैवाहिक जीवनाबद्दल शुभेच्छा दिले* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. आज दिनांक…
बल्लारपूर विधानसभा निवडणुकी 25985 मतांनी विजयी. सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज…
युवराज मेश्राम प्रधान संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उमरेड:- काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल…
महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कन्नड:- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाचे काल निकाल…
कराड तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कराड:- काल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल…