प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सिंधी रेल्वे येथील कायदा सुव्यवस्थेला काळीमा लावणारी घटना तरी सदर आरोपीवर कारवाई नाही प्रशासन कोणाचा दबावाखाली काम करत आहे. अशा प्रश्न भीम आर्मीच्या वतीने प्रशासनाला विचारला आहे?
दिनांक 29 डिसेंबर रोजी नंदा नदी किनारी माता मंदिर परिसरात केसरीमल नगर विद्यालयात मुलीची छेड काढून अश्लील चाळे केल्याप्रकरणी सिंधी पोलिसात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर विषय गावकरी व त्यांच्या कुटुंबाच्या सांगण्यावरून व चौकशी केली असता असा आहे प्रीतम सहारे हा सिंधी रेल्वे परिसरात मागील कित्येक वर्षापासून राहत असतो त्याच्या परिसरात व गावामध्ये वागणूक चांगली व उत्तम अशी छबी आहे हा आपले राजकाम करून घर कुटुंबाचे पालन व नियोजन करतो सर्वांसोबत प्रेमळ भावनेने राहणे आपल्या कामाशी निष्ठावान पणे राहणे असेच त्याचे जीवनात चालू असताना एक गैर कृत्य घटना त्याच्यासोबत घडली जे की पूर्णपण असविधानिक आहे. असे भीम आर्मीच्या वतीने सांगण्यात आले.
प्रीतम हा रोज सकाळी उठून व्यायाम करायला जात असतो व नित्यमताने आपले जीवन जगायचं परंतु गावातील राजकारणी कटस्थ कारणे व बदला घेण्याच्या हेतूने प्रीतमच्या जीवन केले बरबाद. मागील दोन महिन्यापासून सिंधी रेल्वे केसरी नगर विद्यालयातील मुलींना छेड करत आहे व अश्लील चाळे करत वेगवेगळे कृत्य द्वारा शाळेतील मुलींना सतवायचे काम अज्ञान व्यक्ति द्वारा होत आहे असे बोलण्यात आले परंतु एवढा गंभीर प्रकरण असून शाळेतील प्रिन्सिपल व्यवस्थापन यांनी कधीही पोलीसात तक्रार केली नाही तसेच याची सूचना शिक्षण अधिकारी यांना सुद्धा दिली नाही.
अचानक या गोष्टीचा फायदा घेत कुटुंबाच्या माहितीनुसार 29 डिसेंबरला प्रीतमला रेल्वे स्टेशन येथून त्याच्या घराजवळील व्यक्तीने ज्याच्या सोबत नेहमी त्याचा पाण्यासाठी वाद विवाद व्हायचा त्या व्यक्तीने प्रीतमला केसरीमल नगर विद्यालयात नेऊन आधीच लोकांना जमा करून हाच तो मुलींची छेड काढणारा आरोपी आहे असे सांगत त्याला बेदम मारहाण केले व तो आणि त्याचे साथीदार इतक्यावरच न थांबता चक्क शाळेतून दोन किलोमीटर अंतरावर अर्ध नंगे अवस्थेत लाथा बुक्क्यानी मारहाण करणे, शिवीगाळ करणे त्याची दिंडी काढली आणि संपूर्ण जमावाने त्याला बेदम मारहाण केले याला जबाबदार कोण..? चौकशी न करता प्रिन्सिपल द्वारा तक्रार न करता पोलीस स्टेशनमध्ये न नेता त्याला मारण्याचा अर्धनंग व्यवस्थित दिंडी काढण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
विधानभवन मध्ये विरोधी पक्ष द्वारा फडणवीस सरकारवर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र नाहीशी झाली आहे असे बोलल्या गेले होते. या प्रकरणावरून खरी होत दिसत आहे. गृहमंत्री फडणवीस या गरीब लोकांना न्याय मिळणार का ? प्रीतमच्या पत्नी द्वारा सांगण्यात मी सांगितली तशी रिपोर्ट न लिहिता पोलिसांनी त्यांच्या मनाने रिपोर्ट लिहून माझे घेतले हस्ताक्षर या सर्व बाबी आणि संबंधित प्रकरणाचे व्हिडिओ लेखी तक्रार त्यांनी दिनांक 10 जानेवारी ला भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांना दिले निवेदन सदर व्हिडिओ मध्ये जे जे जण प्रीतम सारे यांना मारहाण करत आहे त्यांच्यावर कायदेशीर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कलम 3 (१) मध्ये अर्ध नंग दिंडी काढणे मानवी अप्रतिष्ठा करणे.८, १०, १५, कलम 3 (२) १ व २ भारतीय दंडविधान (i p c) नुसार कारवाई करणे कलम ३(d ) कलम ३( २ ) (५-अ ) नुसार १४१, १४२, १४५, ३१९, ५०६, ३५४-ड, ३४ या सेक्शन अंतर्गत कारवाई केली पाहिजे होती परंतु सिंधी रेल्वे पोलीस द्वारे ३२३, ३४ एन सी देऊन उलट त्याच्या पत्नीवर दबाव टाकण्यात आला आहे व त्यांच्या कुटुंबाला व त्यांच्या पत्नीला या प्रकरण मुळे जीवाला धोका आहे त्यामुळे त्यांची कुटुंब अत्यंत घाबरून भीती त्यांच्या घरी तसेच आजूबाजूपर्यंत तणावाचे वातावरण पसरले आहे.
भीम आर्मीचे प्रामुख्याने मागणी.
१) सदर व्हिडिओ मध्ये मारहाण करणाऱ्यांना कायदेशीर कलम नुसार कारवाई करण्यात यावे
२) प्रीतमच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार एफ आय आर ची नोंद करून प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. ३) सदर अर्जदाराचा पतीविरुद्ध योग्य कारवाई करून निर्दोष असल्यास सदर गुन्हा मध्ये अहवाल सादर करून त्यांना डिस्चार्ज देण्यात यावे
४) पोलीस व शिक्षण अधिकाऱ्याद्वारा केसरी विद्यालयाची चौकशी व घटनास्थळ चे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात यावे आणि दोषी शिक्षकांना शिक्षा सुद्धा देण्यात यावी की त्यांनी दोन महिन्यापासून तक्रार का नाही केले याचा जाब सुद्धा विचारण्यात यावा. असे असाविधानिक कायदा सुव्यवस्था गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर काटेकोर कारवाई करण्यात यावे याकरिता भीम आर्मी कार्यालयाकडून सदर मेल व निवेदन पाठपुरावा करून पाठवण्यात आले सात ते आठ दिवसाच्या अवधीमध्ये आरोपीवर संविधानिक रित्या कारवाई न झाल्यास भीम आर्मी ची संपूर्ण टीम सिंधी रेल्वे येथे होणार दाखल कायदा सुव्यवस्था बिघडल्यास स्थानीय शासन जबाबदार राहणार असे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस महानिरीक्षक नागपूर, पोलीस प्राधिकरण तक्रार विभाग नागपूर, मानव अधिकार मुंबई, गृह मंत्रालय मुंबई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांना देण्यात आले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…