पंकेश जाधव पुणे ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन पुणे:- शहरात दिवसाने दिवस गुन्हेगारी वाढत आहे. त्यात हत्या अवैध धंदे मारामारीच्या घटनेने नागरिक दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी धडक कारवाई सुरू करून अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. त्यात अनेक आरोपींवर स्थानबध्दतेची धडक कारवाई केली. आता पर्यंत 83 गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई केली. त्यामुळे अनेक गुन्हेगाराचे वर्चस्व तोडण्यात पोलिसाना यश आले आहे.
पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे असलेल्या अट्टल महिला गुन्हेगारावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. विमल विजय राठोड वय 43 वर्ष रा. बंजारा मित्र मंडळा जवळ, नाईकनगर, येरवडा पुणे असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या अभिलेखावरील सराईत महिला गुन्हेगाराचे नाव आहे.
अट्टल महिला आरोपी विमल विजय राठोड या महिला आरोपीने आणि तिच्या साथीदारांनी मिळून येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भेसळयुक्त गावठी हातभट्टी दारुची विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षात तिच्या विरुद्ध 11 गुन्हे दाखल आहेत. तिच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच तिच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
आरोपीविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागद पत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी विमल राठोड हिला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा, पीसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…