पोलीस अधिक्षक यांची उरळ येथे फायरींग झालेल्या घटनास्थळी भेट, तपासाचे दिले आदेश.
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- 31 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीत मांजरी फाटा ते कंचनपुर रोडवर एक खळबळजनक घटना समोर आली होती. पोलिसांची गस्त दरम्यान एका मोटर सायकल वरील संशयीत इसमांचा पोलीसांनी पाठलाग केला असता सदर संशयीत यांनी पोलीसांच्या वाहनावर शस्त्र काढून फायरिंग केल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली होती.
संशयीत इसमांने पोलिसावर फायरिंग केल्याच्या घटनेवरून उरळ पोलीस स्टेशन येथे अप क. 432 – 2023 कलम 353, 336, 34, भादंवि सहकलम 3, 25 आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा आज पावेतो उघडकिस न आल्याने नव्याने अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या बच्चन सिंह व अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे तसेच बाळापुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक शंकर शेळके व सोबत पो.उप.नि. गोपाल जाधव व स्था.गु.शा. येथील पथकातील अंमलदार व उरळ येथील ठाणेदार सहा. पोलीस निरिक्षक गोपाल ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीस अधिक्षक यांनी संबधित अधिकारी यांना गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने व तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
पोलीस प्रशासनाकडुन जाहिर करण्यात येते कि, जो कोणी सदर घटनेसंबधी माहिती देईल त्याला 25 हजार रूपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. किंवा प्रत्यक्ष येवुन स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, उरळ पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांच्या जवळ माहिती देवु शकतात अथवा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पो.नि. शंकर शेळके मो.न. ९९२१०३८१११ व पो.स्टे. उरळ ठाणेदार स.पो.नि. गोपाल ढोले ९६०४३६४४०६ यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क करणा-याचे नाव व मो. क. हे गुप्त ठेवण्यात येईल.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…