प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- समस्त व्यापारी बंधू तसेच पुलगाव वासीयांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे की पूल गावातील व्यापाऱ्यावर झालेल्या अन्याय विरुद्ध समस्त व्यापारी इंदिरा मार्केट आंबेडकर मार्केट यांच्या नियोजनाने एक मताने विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय पुलगाव बंद करण्यात येत आहे तरी सर्व पुलागावासीयांनी या मध्ये सहभागी होऊन औषधी उपचार केंद्र दवाखाने यांना सोडून समस्त दुकानदार व्यापारी छोटे मोठे उद्योग धंदे, सब्जी मंडी, पान पॅलेस, कपडा मार्केट, मोबाईल शॉपी, छोटी मोठी हॉटेल्स, सोनार लाईन, इलेक्ट्रॉनिक्स, बुक डेपो, हार्डवेअर इत्यादी सर्व चालक मालकांनी व्यापाऱ्यांना साथ द्या असे आवाहन केले आहे.
मागील कित्येक वर्षापासून सातत्याने ठराव घेऊन नोटीस देऊन तरीसुद्धा पुलगावातील इंदिरा मार्केट व आंबेडकर मार्केट यांचे कर माफ करण्यात आला नाही. यांच्या ह्या लढायला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. याकरिता दिनांक 16 जानेवारी मंगळवार ला ठीक सकाळी 10 वाजता आंबेडकर मार्केट येथून मोर्चाला सुरुवात होणार सर्वांनी आपापले दुकानदारी बंद ठेवून मोर्चामध्ये सामील व्हा संविधानिक रित्या मोर्चा काढून आपली मागणी स्थानीय प्रशासन ते लोक दरबारात माडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाचे नियोजन दि.16 जानेवारी 2024 ला ठीक सकाळी 10 वाजता आंबेडकर मार्केट मधून मोर्चा निघणार शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मार्केट लाईन मधून बालाजी हॉटेल्स कडे जाणार स्टेशन चौक ते श्रीराम हॉटेल समृद्धी मेगा ते हरिराम नगर ते पंचधारा रोड सत्तर बाबा दर्गा ते नाचणगाव नाका ते शनी मंदिर ते गांधी चौक वैष्णवी ज्वेलर्स फुटाणा लाईन स्टेशन चौक ते नगरपरिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निदर्शन व पत्रकार परिषद घेण्यात येणार.
प्रमुख मागण्या.
1) गाळे धारकांवर लागलेले जास्तीचे कर माफ करण्यात यावे.
2) गाळे सारखे तर टॅक्स सारखे असावे
3) अभद्र व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
4) जिल्हा प्रशासना द्वारा त्वरित समिती गठीत करून सह नियोजनाने व्यापाराच्या समस्या सोडण्यात याव्या लवकरात लवकर मार्ग व तोडगा काढण्यात यावा.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…