तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधि
मो. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- फीमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपूर च्या वतीने राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ माध्य विद्यालय काढोली बू.(ता.राजुरा) येथे शुक्रवार दि.12.1.2024 रोजी माजी आमदार तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर यांच्या हस्ते व फीमेल एज्युकेशन सोसायटी चे सचिव ॲड.पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी विमाशि चे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे गुरुजी, मंडळाचे सदस्य केशवराव शेंडे, ग्रा.पं.चे सरपंच शैलेश चटकी, माजी सरपंच राकेश हिंगाने, उपसरपंच सौ सुषमा उरकुडे, ग्रा.पं.सदस्य निलेश किंगरे, प्रतिष्ठित नागरिक बाबुराव पा. झाडे, प्रभाकर पिंपळकर, प्राचार्य डॉ. मिनाक्षी ठोंबरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र बारसागडे, मुख्याध्यापक बंडू नगराळे सह मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 11ते 17 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या शिबिरातून श्रमसंस्कार, सायबर सुरक्षा, रोजगार, स्वयंरोजगार, करिअर मार्गदर्शन, मतदार जनजागृती व युवकांचा सहभाग, विकसित भारत करिता तरुणांचे योगदान, विविध शासकीय योजनांची माहिती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी शिबिरार्थींना सहकार्य करून या उपक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केले. मंडळाचे सदस्य स्वर्गीय गजाननराव गावंडे गुरुजी यांना दोन मिनिट मौन व्रत धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…