उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिजाऊने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर कशी मात केली. तशीच आत्ताच्या स्त्रियांनी संकटावरती मात करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे मत जिजाऊच्या वेशभूषेत जनजागृती करणाऱ्या डॉक्टर मनीषा जमणे यांनी व्यक्त केले. बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहाराच्या उपाध्यक्षा सुनीता धम्मकीर्ती यांनी जिजाऊने जसे शिवबाला घडवले तसेच येणाऱ्या पिढीला आपण घडवू असा संदेश त्यांनी दिला जिजाऊचा आदर्श इतिहास तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी जिजाऊची वेशभूषा करून त्यांचा इतिहास समोर मांडला.
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये लहान मुलींची, महिलांची वेशभूषा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. माता जिजाऊच्या वेशभूषेत डॉक्टर मनीषा जमणे व सुनिता धम्मकीर्ती यांनी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी जिजाऊच्या वेशभूषा केलेल्या कलाकारांचे जिजाऊ गर्जना करून व त्या कलाकारांवरती फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. मैत्री लांडगे, विधी लांडगे या चिमुकल्यांनी घोषणा दिल्या. पूर्वा मधाले, देवयानी मधाळे यांनी जिजाऊच्या विषयीकाही प्रसंग भाषणातून मांडले.
यावेळी स्वामी विवेकानंद जयंती ही असल्याने सिद्धार्थ डावरे या चिमुकल्याने भाषण दिले. अश्विनी माने यांनी कसे झुंजावे ही प्रेरणादायी कविता सादर केली. नमामि पवार तिनेही आपल्या भाषणातून जिजाऊ चे विचार मांडले. या कार्यक्रमानंतर सर्वांनी जिजाऊ जयंती निमित्त स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमास श्रावस्ती विहाराच्या संचालिका दीपमाला कांबळे, संचालक संजय माने, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, विजय लांडगे, संजीव साबळे, बाळू शिंदे अजित माने, भारत कदम, मोहिनी नरवाडे, सपना भिसे यांनी या कार्यक्रमाची दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावस्ती विहाराचे सचिव पवन उर्फ शिवाजी वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन चेतना नागवंशी यांनी तर आभार अवंतिका वाघमारे यांनी मानले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…