रितेश गाडेकर वाशिम तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वाशिम:- जिल्ह्यातील अनसिंग येथे प्रभू श्री राम यांच्या अयोध्या मध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप मोठ्या उत्साहात अनसिंग येथे संपूर्ण गावात करण्यात आला.
या निमंत्रण व अक्षता वाटप ची सुरुवात गावातील हनुमान मंदिरापासून करण्यात आली. गावातील तरुण मुलांनी व महिलांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका व अक्षता घरोघरी जाऊन दिल्या. टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग गात महिला पुरुष व तरुण मंडळीनी गावात प्रभात फेरी काढली. व जो राम को लायेंगे हम उनको लायेंगे यांचा जयजयकार करण्यात आला.
त्यापूर्वी जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या वरून प्रसारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वाची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. त्यानुसार गावातील प्रत्येक मंदिरात भजन,कीर्तन, आरती व पाठ पूजा करावी.तसेच प्रसाद वितरण करावे. तसेच सांजवेळेला घरा समोर दिव्याची आरास रोषणाई करावी. हा सोहळा आपआपल्या गावात गल्ली मोहल्यात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करावा असे आवाहन परीक्षितजी जावळे नागपूर प्रांत सहप्रचारक, मयूर निखार वाशिम जिल्हा प्रचारक,योगेशजी मोरे तालुका प्रचारक, मदनजी काळे तालुका कार्यवाह अनसिंग मंडल स्वयंम सेवक ह्यांच्या उपस्थितित पार पाडण्यात आला आहे. या निमंत्रण व अक्षता वाटप कार्यक्रमात सांगितले.या कार्यक्रमात ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…