अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. – ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १५ जाने:- राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १४ जानेवारीला समर्पण फाउंडेशन सावनेर तर्फे युथ हुंकार २०२४ ही पाचवी आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन युथ हुंकार वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमात सावनेर तालुक्यातील एकूण 42 शाळा व महाविद्यालयातील 1-1 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयावर शाळेच्या गणवेशामध्ये 7 मिनिटापर्यंत हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये भाषणे झाली.
राष्ट्रीय युवा दिनी कार्यक्रमादरम्यान विजयी विद्यार्थ्यांद्वारे जसे राष्ट्र निर्माण मध्ये तरुणांचे योगदान, भारतीय इतिहासातील माझे आदर्श व्यक्तिमत्व, माझी आई कोलार नदी संवर्धन, डिजिटल भारताचे भविष्य, विकास आणि पर्यावरण इत्यादी विषय होते.
या कार्यक्रमात निर्णयाक भूमिकेत अर्जुनसिंग सावजी, दिनेश कुमार किनकर आणि सौ भावना विनोद बागडे होते. यांनी मुलांना प्रोत्साहन देत वक्तृत्व शैलीच्या विकासासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल मस्के पोलीस उपअधीक्षक सावनेर यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले की स्वामी विवेकानंदन ला समजा वाचा आणि जीवन जगत असताना आपले उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत थांबन्याची गरज नाही.
या कार्यक्रमात इयत्ता 8 वी ते 10वी शालेय गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक
संस्कृती गणेश मदनकर श्रीराम विद्यालय नांदागोमुख, द्वितीय पारितोषिक हर्षल संपत नागोसे आदर्श विद्यालय पाटणसावंगी तर तृतीय पारितोषिक धृव हरीश पानपत्ते सारस्वत पब्लिक स्कूल सावनेर ला मिळाले. तसेच महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक इयत्ता 11 ते पदवीधर गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक कु.पायल प्रकाश कडक गोमुख विद्यालय नांदागोमुख, द्वितीय पारितोषिक कु. मयुरी डडबल आदर्श ज्युनिअर कॉलेज पाटणसावंगी आणि तृतीय पारितोषिक कुमारीं मीनल जनार्दन मेश्राम महाराष्ट्र विद्यालय जुनियर कॉलेज खापरखेडा ला मिळाले.
समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष अँड.अभिषेक मुलमुले यांनी युवकांच्या मानसिक व व्यक्तिमत्व विकासासाठी फाउंडेशन नी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन, विद्यार्थी गौरव व कोलार पुनर्जीवन अभियांना बद्दल महिती दिली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष तुषार उमाटे यांनी कार्यक्रमाच्या येशास्वितेकरिता समर्पण फाउंडेशन सावनेरचे सचिव श्री.कुलभूषण नवधिंगे,उपाध्यक्ष डॉ.नितीन पोटोडे, अभिषेकसिंह गहरवाल, विनोद बांगडे, प्रवीण नारेकर आणि उपस्थित सर्वशाळेतील शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.राहुल दाते यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…