उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- देशात आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आघाडी युक्ती मध्ये उमेदवारीसाठी आता पडून रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. अकोला मतदारसंघ ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीने राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ समजला जातो. अशातच अकोल्याची जागा ॲड. प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, या जागेवर आपण दावा करणार नाही असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
अकोल्याची जागा तुम्ही मागणार का ? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अकोल्याची जागा आम्ही ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली आहे, असं मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ग्रामीण भागातील भूमिहीन नागरिकांना पाच एकर जमीन मिळावी, यासाठी राज्य शासनाने समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. भूदान चळवळीप्रमाणे पुन्हा एकदा मोहीम राबवली जाऊ शकते का? या दृष्टीने देखील प्रयत्न राहतील. विदर्भाला न्याय मिळावा, ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका राहिली आहे. आगामी काळात विदर्भात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न केले जातील, असे रामदास आठवले म्हणाले. सिंचन समस्या सोडवाव्यात, उद्योगवृध्दीला चालना द्यावी, बेरोजगारी कमी करावी, अशी रिपाई आठवले गटाची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस अशोक नागदेवे, जिल्हाध्यक्ष सुनील अवचार प्रामुख्याने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…