उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश देत ! ऑनलाईन:- देशातील सर्व निवडणूका ईव्हीएम आणि व्हिव्ही पॅट सोबत न घेता मतपत्रिका ‘बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यात यावेत, अशी मागणी सम्राट अशोक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी मार्फत आयुक्त राष्ट्रीय निवडणूक आयोगाला मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.
सम्राट अशोक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम वापराला जोरदार विरोध दर्शवित जोरदार निदेर्शने केलीत. देशाला जडलेला रोग म्हणजे भ्रष्टाचार’ आहे. या भ्रष्टाचाराचा मुख्य आधार म्हणजे लोकशाहीच्या नावाने राजकारण करून सर्वच राजकीय पक्षांनी व संघटनांनी घटनात्मक व नैतीक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळे आणि लोकशाहीतील इतर जबाबदार घटकांनी बघ्याची भुमीका घेतल्यामुळेच स्वातंत्र्यनंतरच्या अवघ्या ७५ वर्षात देशाचा प्रवास स्वातंत्र्याकडून पुन्हा एकदा गुलामीकडे जाताना दिसत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने इलेक्ट्रीक व्होटींग ईव्हीएम मशीनचा वापर यापुढे बंद करुन ईव्हीएम सोबतच्या व्हीव्ही पॅडवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलना सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाट व सहकारी सहभागी झाले होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…