युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला धरले धारेवर
नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरामध्ये लिटिल फ्लॉवर हायस्कुुल ही शाळा असून या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब पालकांचे विद्यार्थी शिकत आहेत. काही कारणास्तव पालकांनी शाळेची फी वेळेवर भरू शकत नसल्यामुळे ते टप्या-टप्याने फी भरत होते. परंतू, शाळेच्या व्यवस्थापनाला एकरकमी फी पाहिजे असल्यामुळे शाळेकडून मुलांवर अत्याचार करीत शाळेने अंदाजे ३५० विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न दिल्याबद्दल पालकांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांकडे तक्रार केली असता युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह युवासेना सचिव राहुल लोंढे, युवासेना महाराष्ट्र समन्वयक नितिन लांडगे, विराज निकम, ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने तसेच सुशांत मयेकर,अखिल माळवी हे त्वरीत शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी शाळेत पोहचले.
यावेळी पालकांकडून शाळेच्या व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे अमानुष वागणुक दिली जाते याचा पाढाच पालक युवासेनेपुढे वाचू लागले. यावेळी पालकांनी असे सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनाकडून ज्या मुलांची फी बाकी आहे त्या मुलांना वॉशरूमला न पाठविणे, वॉशरूमला जायचे असल्यास पन्नास रूपये फाईन लावणे, मुलींनी कपाळाला टिकली लावली असल्यास पन्नास रूपये फाईन, विद्यार्थी मराठीत बोलताना दिसल्यास पन्नास रूपये फाईन, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे, अश्या पध्दतीने शाळेच्या व्यवस्थापनाचा मनमानी कारभार चालू असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच हा व्यवहार कॅशने होत असल्यामुळे त्याचा कुठेही लेखी हिशोब नाही. अश्या एक ना अनेक तक्रारी युवासेनेकडे करण्यात आल्या.
पालकांकडून या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर पुर्वेश सरनाईक व त्यांच्या सहकार्यांनी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची भेट घेतली. वरील सर्व तक्रारींबाबत जाब विचारला व कोणत्याही विद्यार्थ्यांला शाळा व्यवस्थापन परिक्षेपासून वंचित ठेवू शकत नाही, अश्या शब्दात ठणकावून सांगण्यात आले. यावर शाळेने दिलगिरी व्यक्त करत व पालकांच्या नावे माफीनामा देत ज्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेतल्या नव्हत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिवशीचा बुडलेला पेपर सोमवार दि. २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याचे माफीनाम्यात कबुल केले व उद्यापासूनचे नियमित पेपर घेण्यात येतील, असे शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले. तसेच शाळेला फी घेण्याचा जसा अधिकार आहे तसचा उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हा विद्यार्थ्यांचा मुलभुत अधिकार आहे याची जाणिव पुर्वेश सरनाईक यांनी शाळा व्यवस्थापनाला करून दिली.
शाळेच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास देण्यात आला यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर साहेब यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई करण्यासाठी मागणी पुर्वेश सरनाईक यांनी केली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलन केले त्यांच्या पाल्यास शाळेतर्फे कोणताही त्रास होणार नाही यासाठी युवासेना कायम कटिबध्द असेल असा शब्द पुर्वेश सरनाईक यांनी पालकांना दिला. यावेळी युवासेनेचे साई ढवळे, सतीश आंब्रे, प्रमोद भिसे, राकेश जैस्वाल, विशाल कुडिया, विनय कलगुटकर व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…