उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा मेहकर :- मेहकर तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नव्या वाहन चालक कायद्याच्या विरोधात देशभरातील चालक समुहामध्ये मोठा संताप आहे. बेरोजगार भूमिहीन शोषीत दलित बहुतांश गरीब असलेले लोक ड्रायव्हर लाईनमध्ये आलेले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सहा सहा महिने ते कुटुंबाला सुध्दा भेटत नाहीत. त्यांची साधी कामगार म्हणून नोंद सुध्दा नाही. त्या कामगाराचे वेतन हे धोरण सुध्दा लागू नाही. कुणी पाच तर सहा सात हजार रुपयात महिनाभर काम करीत आहेत. आणि अशा वेळी सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष शिक्षा जर नव्या कायद्यानुसार मिळणार असेल तर त्याला घटना घडताच स्वतःला संपवून घ्यावे लागणार आहे. नवा कायदा हा जाचक आहे. भयभीत करणारा आहे. त्या विरोधात चालक वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे. तरी तात्काळ नवीन वाहन कायदा हा रद्द करण्यात यावा व वाहन चालकांना सरकारी दरमहा भत्ता देण्यात यावा.
2) मानवतेला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात रोहा पिंपळगांव येथे घडली आहे. एका 6 वर्षाच्या मराठा समाजाच्या चिमुकलीचे अपहरण करुन तिला मारुन टाकण्यात आले आहे. 22 तास मुलगी बेपत्ता होती. सदर 19 किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला आहे. आरोपी अद्यापही फरार आहे, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करीत आहे. तरी त्यात पोलीसांनी 22 तासात मुलगी सापडली नाही, पोलीसांनी तात्काळ भूमिका घेऊन कारवाई केली असती तर ती चिमुरडी गेली नसती. राज्यात पोलीसांची भिती ही राहिलेली नाही. संबंधीत पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे. व तपास सीआयडी मार्फत करुन प्रकरणाची चौकशी करावे व आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी.आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…