अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. – ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नागपुर जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रविवार दी.21 जानेवारीला दुपारी सौसर येथे जिल्हास्तरीय बौद्ध महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान समता सैनिक दल वर्धा, चंद्रपूर, नागपूर, महार रेजिमेंटचे सैनिक उपस्थित राहून अभिवादन व मानवंदना देतील. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
रविवार 21 जानेवारीला सकाळी 10 वाजता सावनेर येथील संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बौद्ध अनुयाया कडून डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत करण्यात येणार असून अभिवादना नंतर सैकडो च्या संख्येने बौद्ध उपासक रैली ने सौसर येथे जातील.
सातनूर सीमेवरून भीमसैनिकांनी मोटारसायकल आणि कार रॅली काढनार आहे. कार रॅली सातनूर, पारडसिंगा, बोरगाव, बजाज कॉलनी, जाम मार्गे सौसर बाजार चौकात पोहोचेल. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अशोक भगत, तहसील अध्यक्ष लक्ष्मीदास बोरकर, मुकेश बागडे यांनी सांगितले की, 21 जानेवारीला बौद्ध धम्म परिषदेत संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न, प.पू. राजरतन, भन्ते सारीपुत्र भडत शीलरक्षित महाथेरो, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशांक जाधव, अनिल जवादे, खासदार मुकुल वाघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, आंबेडकरी वक्त्या उषाताई बुद्ध, वर्धा जिल्हाध्यक्ष विशाल मानकर, नागपूर ग्रामीण अध्यक्ष रजित राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात टीव्ही आणि रेडिओ कलाकार अरुण सहारे आणि त्यांच्या टीमतर्फे चलो बुद्ध की ओर संगीत वाद्यवृंदाचा कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आदी राज्यातील बौद्ध धर्मीय लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे सह आयोजक मुकेश बागडे यांनी सांगितले आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…