संतोष मेश्राम राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा कार्यालयाच्या वतीने दि.२९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत संध्या विहार समिती पद्ममापूर ता. जी. चंद्रपूर येथे स्काऊट्स गाईड्स जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय येथे आढावा सभा जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे , जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी (माध्य.) कु. निकीता ठाकरे, बहुजन हिताय चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष विजय टोंगे, बहुजन हिताय चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी सदस्य लक्ष्मणराव धोबे, जिल्हा संघटक (स्काऊट ) चंद्रकांत भगत, मेळावा प्रमुख किशोर उईके, हा कार्यक्रम प्रमुख शांताराम उईके, मेळावा उपप्रमुख (स्काऊट) यशवंत हजारे, मेळावा उपप्रमुख (गाईड) रंजना किन्नाके , मेळावा क्वार्टर मास्टर प्रशांत खुसपुरे, मेळावा प्रसिद्धी प्रमुख बादल बेले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी कार्यालयात सूक्ष्म नियोजन करून सर्वांनी प्रत्यक्ष मेळावा स्थळी जाऊन पाहणी केली आणि मेळाव्याच्या यशस्वीते करिता नियोजन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ३८ शाळांचे ९१४ च्या वर विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असून या मेळाव्यात प्रथमोपचार, संचलन (मार्चपास), ग्याझेट व तंबू निरीक्षण, शारीरिक कवायती, मानवी मनोरे, शेकोटी कार्यक्रम, विविध सामाजिक संदेश, जनजगृतीपर शोभायात्रा, साहसी खेळ इत्यादी स्पर्धा होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्वावलंबन, पर्यावरण बद्दल जनजागृती, प्रथमोपचार माहिती व प्रात्यक्षिक, साहसी खेळांच्या माध्यमातून भीती घालवणे, शेकोटी कार्यक्रमातुन सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक विकास आदीं बाबींवर या मेळाव्यात मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक होणार आहेत त्यामुळे सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि नियोजन समिती ने एकमेकांशी समन्वय साधून हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन राजकुमार हिवारे, जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी यावेळी केले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…