संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो. न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वसमावेशक वस्तुनिष्ठ आराखडा तयार करावा, अशा सूचना रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.
मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीविषयी आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, वन विभागाच्या सुनिता सिंग, फलोत्पादनचे संचालक डॉ. केलास मोते, बांबू तज्ज्ञ व दापोली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अजय राणे आदी उपस्थित होते.
बांबू लागवड करण्यासाठी हेक्टरी 6 लाख 97 हजार रुपये अनुदान मनरेगा अंतर्गत देण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री. भुमरे म्हणाले, कृषी विभाग, वन विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग यांनी संयुक्तपणे बांबू लागवडीसाठी द्यावयाच्या अनुदानाचा सविस्तर आराखडा तयार करावा. त्यामध्ये मजुरांचे आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे. वैयक्तीक लाभाची योजना राबवताना ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर राबवली जावी, अशा सूचना मंत्री श्री. भुमरे यांनी दिल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि. 9 जानेवारी, 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच उद्योग क्षेत्
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
Writing a book review essay Take out large chunks first. Looking on how many words…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…