मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यापासून 50 ते 60 किमी अंतरावरील उमानुर परिसरातील जोगनगुडा गावातील मूलभूत समस्या व बारमाही रस्त्यांची अडचण स्वातंत्र्या अमृत महोत्सवाच्या 75 वर्षानंतरही जैसे थे च असल्याने गावभेटी अंति भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ कोरेत यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करून समस्यांचा पाढा शासन दरबारी मांडून सोडविण्याचे आश्वासन दिले.
जोगनगुडा गावात नाल्यांचा अभाव, गावाला मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी असलेल्या नाल्यावर पुलाची सोय नसल्याने पावसाळ्यात बेटाचे स्वरूप होऊन जगाशी संपर्क तुटतो. शुद्ध पिण्याच्या पाण्याची राजकारणी फक्त मतदानावेळी डरकाळी फोडतात. याच्या अभावाने क्षारयुक्त पाणी पिल्याने अनेकांना रोगांचा सामना करावा लागतो. अशा अनेक समस्याग्रस्त जोगणगुडा वासियांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलेल्या संदीप कोरेत यांनी सदर मूलभूत समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शासन दरबारी मांडून पूर्ण करण्याचा शब्द देत असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ पडल्यास आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिल्याने गावकऱ्यांनी संदीप भाऊंचे आभार मानून आनंद व्यक्त केला. यावेळी संतोष चंदावार , देवेंद्र खतवार, संदीप चंदावार, मुन्ना झाडे, सुधाकर कोरेत, दिवाकर मेडी व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…