अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरिया इसमास केले जेरबंद..

पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :– दि २०/०१/२०२४ रोजी पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर व तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२चे स्टाफसह मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक विदेशी नायजेरियन इसम हा वास्तुश्री अपार्टमेंट मार्केट यार्ड पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी कोकेन हा अमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर व अमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे जोसेफ रोतीमी वय 30 वर्ष राहणार रिद्धीम चर्च मिरा रोड मुंबई मूळ देश नायजेरिया हा त्याच्या ताब्यात *एकूण 6.88.800 /- रुपयाचा ऐवज त्यामध्ये
१) 6.28.600/- किमतीचा 31 ग्रॅम 44 मिलिग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ,
२)५०,०००/-रु किमती पांढरा रंगाची स्कूटर होंडा एक्टिवा कंपनीची
3) 10.000/- रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा अमली पदार्थ व ऐवज हा विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर —/2024 एनडीपीएस कलम 8 ( क ), 21(ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे सह पोलिस आयुक्त ,श्री. अमोल झेंडे सो पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री.सतीश गोवेकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, योगेश मांढरे. नितीन जगदाळे. युवराज कांबळे. साहिल शेख.संदिप शेळके महेश साळुंखे, अजीम शेख. संदीप जाधव, दिनेश बाष्ठेवाड यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

13 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

13 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

16 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

20 hours ago