उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- मतदार नोंदणीसाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविला गेलेला घरोघरी भेटीद्वारे पडताळणी कार्यक्रम, मतदार याद्यांचा निरंतर पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी व जनजागृती आदी निवडणूक कामकाजाच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पारितोषिक जाहीर झाले आहे.
१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी अकोला जिल्ह्याची एकूण मतदार संख्या ही १५ लक्ष ३३ हजार ९९३ इतकी होती व त्यापैकी १८-१९ वयोगटातील मतदार संख्या ही ४ हजार १२ (०.२६ टक्के) इतकी होती.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विशेष मोहिमेअंतर्गत वय वर्षे १८ ते १९ वयोगटातील पात्र मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करुन शाळा, महाविद्यालये, युवा महोत्सव, सार्वजनिक ठिकाणी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन, तसेच मतदान केंद्रांवर नोंदणीचे कार्यक्रम राबविण्यात आले.
अकोला जिल्ह्यात विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविल्याने मतदार संख्या ह २० हजार ६३३ (१.४१ टक्के) पर्यंत वाढविण्यात यश प्राप्त झाले. त्याचप्रमाणे, मतदार यादीतील पुरुष-स्त्री लिंग गुणोत्तर प्रमाण प्रारुप् मतदार यादी मध्ये ९३० होते. ते आता अंतिम मतदार यादीमध्ये लिंग गुणोत्तर हे ९३८ इतके आहे. महिला मतदारांच्या संख्येत प्रारुप मतदा यादीच्या तुलनेत एकूण १९ हजार ८१४ इतक्या मतदारांची वाढ झाल आहे. ही वाढ २.६८ टक्के इतकी आहे व लिंग गुणोत्तर ८ गुणांकान वाढले आहे. अंतिम मतदार यादीमधील एकूण मतदार संख्या आज रोज १५ लक्ष ६२ हजार ७० इतकी असून त्यामध्ये प्रारुप मतदार यादीच्य तुलनेत २८ हजार ७७ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे भटक्या व विमुक्त जमातीमधील मतदारांची नोंदणी करण्यासाठ सेवाभावी संस्थेच्या सहाय्याने जिल्ह्यातील पात्र मतदारांचा शोध घेऊन त्यांचे प्रत्यक्ष वास्तव्य असलेल्या ठिकाणी वाडी, वस्ती, पाड्यांव जाऊन विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले व त्या माध्यमातून मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. नाविन्यपूर्ण उपक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, कावड यात्रा इत्यादी ठिकाणी मतदार नाव् नोंदणीबाबतचे स्टॉल लावून त्याठिकाणी अर्ज भरुन घेण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, महिल बचत गट, कर वसुली लिपीक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्य स्तरावर विशेष मोहिम राबवून त्यांचे कार्यक्षेत्रातील पात्र मतदारांकडून मतदार नोंदणीबाबतचे अर्ज भरुन घेण्यात आले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…