उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहर आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नव्याने जिल्हा अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारलेल्या बच्चन सिंह यांनी गुन्हेगारी वर्चस्व मोडण्यासाठी कमर कसली आहे.
अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील रामदास मठ येथे राहणारा कुख्यात गुंड राहुल मोहन रंधवे याच्या विरूध्द एमपीडीए ॲक्ट अन्वये कारवाईची तरतूद करून त्यास पुढील एका वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मंगळवार, दिनांक 23 जानेवारी रोजी केली आहे.
शहरातील रामदास मठ, अकोटफैल येथे राहणारा कुख्यात गुंड राहुल मोहन रंधवे याच्यावर यापूर्वी घातक शस्त्रांनी जबर दुखापत पोहोचवणे, दुखापत करणे, हमला करण्याची पूर्वतयारी करुन नंतर गृह-अतिक्रमण करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दुखापत करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर तो कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने त्याच्या विरुध्द गंभीर दखल घेण्यात येऊन कुख्यात गुंड राहुल मोहन रंधवे याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केल्यानंर त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री पटल्याने त्यास एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात कुख्यात गुंडाविरुध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्द आदेश पारित केले. जिल्हादंडाधिकारी कुंभार यांच्या आदेशावरून कुख्यात गुंड राहुल मोहन रंधवे यास सदर आदेश तामील करून त्यास 23 जानेवारी रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…