अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ जाने:- सावनेर शहरातील श्री.गणेश वाचनालय सावनेर,गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ, व्यापारी संघ सावनेर आदी पदाधिकारी तसेच गडकरीप्रेमींच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी निवासस्थानी भेट दिली.गणेश वाचनालय सभागृह,स्मशानभूमी व पुतळा स्थळी पोहचुन माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.
कै राम गणेश गडकरी यांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त सावनेर येथील गणेश वाचन सभागृहात सर्वप्रथम रधुनंदन जामदार, माजी नगराध्यक्ष तथा अरविंद लोधी, अँड्.पल्लवीताई मुलमुले, विनोद जैन, पुर्व नगरसेवक तेजसींग सावजी, डॉ.विजय धोटे, किशोर पटेल आदींच्या उपस्थितीत राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले, मुकेश झारबडे, राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सचिव प्रा.विजय टेकाडे व शिक्षक वर्ग, गडकरी स्मृती निलयमचे राजेश पेंढारी व दैनिक निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे, माजी नगरसेवक सुजित बागडे व इतर गडकरीप्रेमींनी. राम गणेश गडकरी यांचे स्मरण करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले.
श्री राम गणेश गडकरी वाचनालयाच्या प्रांगणात माजी नगरसेवक तेजसिंग सावजी, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.विजय धोटे, गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले आदींनी यावेळी आपले मनोगत मांडत राम गणेश गडकरी यांना आदरांजली वाहिली.तर राम गणेश गडकरी वाचन कक्षाचे अध्यक्ष अँड्.चंद्रशेखर बरेठिया यांच्या प्रयत्नांनी श्री गणेश वाचन कक्षात उपलब्ध MPSC, UPSC सारखी स्पर्धात्मक सुमारे २८ हजार पुस्तके, ग्रंथ आणि स्पर्धात्मक पुस्तकांची माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी या वाचन कक्षात उपलब्ध पुस्तकांचा उपयोग करण्याची विनंती करण्यात आली.
श्रीराम गणेश गडकरी वाचनालयाचे शंकर ढोके, सुधाकर दहीकर, रघुनंदन जामदार, राजपुते सर, प्रशांत जामदार, राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभा ताजणे यांनी 105 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा.बोरीकर सर, प्रा.बावणे, प्रा.फारकडे, घुगल सर, प्रा.निखाडे, प्रा.गायकवाड, प्रा. ठाकरे, प्रा.देशमुख, प्रा.उमाटे, प्रा.धांडोळे, प्रा.पानतावणे, प्रा.मोवाडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक किशोर धुंडेले यांनी केले तर आभार श्री.राम गणेश गडकरी वाचन सभागृह सचिव श्री.भूपेंद्र पुरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा पत्रकार मुकेश झारबडे, श्री.राम गणेश वाचन सभागृहाचे नितीन पुरे,अजय आलघरे,अतुल नलगुंडवार आदींनी परिश्रम घेतले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…