मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक २६ जानेवारी 74 व्या प्रजासत्ताक दिनी बंगाली कॅम्प कालीमाता मंदिर जवळ भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ध्वजारोहण विजय नल्लावार जिल्हा सचिव भाजप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संदीपभाऊ कोरेत भाजप आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना संदीप कोरेत म्हणाले की, 150 वर्षांच्या गुलामगिरीतून 15 आगस्त 1947 रोजी भारत जरी स्वांत्रत झाला असेल तरी तो चालवला जाणार याबाबत कोणताही अधिकृत ठरले नव्हते पण याच दिवशी न्याय, समता, बंधुता राष्ट्रांची एकता व एकात्मता हि मूलभूत उद्दिष्टे तर सर्वभोम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हे राजकीय व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करण्यात आले. सोबतच संविधानाने दिलेल्या ज्या नियमांच्या आधारे आपला देश चालवला जातो. या नियमांना संविधानाच्या भाषेत ‘कायदे’ म्हटले जाते. आपले हक्क, कर्तंव्य, आपली राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था सारे काही संविधानातील याच कायद्यांआधारे चालते. हे कायदे संविधानाच्या रुपात 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले आणि भारत देश प्रजासत्ताक झाला. त्यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करतो असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजप जेष्ठ नेते अशोक पुल्लुरवार, जेष्ठ नेते विनय बाला, भाजप विशेष निमंत्रित सदस्य नवीनजी बाला, अचिंत सरकार, मनमोहन मंडल, विभुती सरकार, युवा मोर्चा कार्यकर्ते अनुज बाला, भाजप तालुका महामंत्री प्रसाद पुल्लुरवार, नगरसेवक दिपक सोनटक्के, नगरसेविका रेखा मोहुर्ले, नगरसेविका निर्मला कोंडबत्तुलवार, नगरसेवक बिरजु तिम्मा, व ईतर नागरिक उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…