हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. अज्ञात आरोपींनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची निर्घृणपणे हत्या केली आहे.
चंद्रपुर शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या सरकारनगर परिसरात 30 वर्षीय शिवसेनेचे युवा नेते शिवा वझरकर यांचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडला. प्रथमदर्शी असे दिसून येते की कुणीतरी त्याची हत्या करून मृतदेह फेकला आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.
यावेळी हत्या करण्यात आलेल्या शिवा वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली आहे. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.
शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षकडून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…