नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे आयोजन. कृषी व ग्रामीण पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार व पर्यावरणाचे संवर्धन, ग्रामीण संस्कृतीचा जपला वारसा.
संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा २७ जाने:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे राजुरा तालुक्यातील चनाखा येथील एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रात या केंद्राचे संचालक रिंकू मरस्कोल्हे, उर्मिला मरस्कोल्हे, नितिन मुसळे, शुभांगी मुसळे, रूपेश शिवणकर, सुहास आसेकर तसेच मोकळा श्र्वास पर्यटन केंद्र सुरू झाल्या पासून तिथे सेवा देणारे अनिल वांढरे, लीलाताई इप्पावार यांचा शॉल, श्रीफळ, वृक्ष कुंडी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन, खाद्यपदार्थ, बैलगाडीतुन फेरफटका, साहसी तसेच विविध खेळ, विविध फुल-फळ झाडांची प्रत्यक्ष माहिती, पाण्यातील मनोरंजन अश्या विविध मनोरंजनात्म बाबींनी पर्यटनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक याठिकाणी भेटी देत आहेत.
आज मोठ्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगलांची मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने पर्यावरणाला बाधा पोहचली आहे. परंतु पडीत जागेचा योग्य उपयोग करून अत्यंत चांगले कृषी व ग्रामीण पर्यटन उभारून नागरिकांना याचा लाभ मिळवून देत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नेफडो संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोहनदास मेश्राम, अविनाश दोरखंडे, सुवर्णा बेले, संगीता पाचघरे, सचिन मोरे, वर्षा कोयचाडे, सुमैया शेख, मंदा सातपुते, अंजली गुंडावार, प्रणाली ताकसांडे, संदीप आदे, भास्कर करमनकर,आसिफ सैय्यद, श्रीरंग ढोबळे, लता कुळमेथे, दूर्वा बेले आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या नागपूर विभाग उपाध्यक्षा सुनैना तांबेकर यांनी केले. तर आभार मोहनदास मेश्राम यांनी मानले.
पर्यावरण संवर्धनासोबतच कृषी व ग्रामीण पर्यटन तसेच स्थानिकांना रोजगार, ग्रामीण सांस्कृतिचे दर्शन, मनोरंजनात्मक साहसी खेळ, अतिशय मनमोहन असे हे पर्यटन केंद्र परिश्रमाने तयार करणाऱ्या या संचालकांचे सत्कार करताना आम्हाला आनंद झाला. प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हेच आम्हचे उद्दिष्टे असून त्याकरिता अश्या होतकरूंचे सत्कार होणे आवश्यक असल्याचे मत बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी व्यक्त केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…