राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपा बाबत गुरुवारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जवळपास सात तास चर्चा झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चार जागा देण्याबाबत काहीच निश्चित ठरले नसल्याचे सांगून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊत यांना उघडे पाडले. त्यामुळे जागावाटपाचे सूत्र अंतिम व्हायला आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक गुरुवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, या बैठकीत प्रकाश आंबेडकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाल्याचे समजते.
या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या सूत्राबाबत चर्चा झाली. यात झालेल्या चर्चेनुसार लोकसभेची जागा जिंकण्यासाठी ज्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल, त्या पक्षाला तो मतदारसंघ देण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मागे ताकदीने उभे राहण्याबाबतही उपस्थित नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. या वेळी प्रत्येक पक्षाने मतदार संघनिहाय जे काही सर्वेक्षण केले आहे, त्याविषयी ही ओझरती चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना आघाडी सोबत घ्यायचे झाल्यास त्यांना प्रत्येकी एक जागा सोडण्याबाबतही चर्चा झाल्याचे कळते. या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोट्यातून देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…