राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मराठी चित्रपट सृष्टीतमधील एका अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर फेसबुकवर ओळखीतून आरोपीने एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला असून विराज रविकांत पाटील राह. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी हा एका माजी आमदाराचा मुलगा आहे. अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करुन तिच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिंगरेनगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये याबाबत शुक्रवारी २६ जानेवारी तक्रार दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी आहे. तो माजी आमदार रविकांत पाटील यांचा चिरंजीव आहे. पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तसेच सोलापूर धून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. तक्रारदार तरुणी अभिनेत्री असून तिने तक्रारी नुसार, आरोपी आणि या तरुणीची ओळख फेसबुकवर झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगत तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. कालांतराने आरोपी या तरुणीला टाळू लागला. त्यामुळे तक्रारदार तरुणीने त्याबाबत विचारणा केली, असता विराज पाटील याने तिला शिवीगाळ केली.
तसेच त्याच्याकडे असलेलं पिस्तूल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो, मी कोण आहे? अशी धमकी देत धक्काबुक्की केली, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…