माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उर्स महोत्सवा निमित्ताने दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन. आयोजित कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंच्या येथे हजरत वली हैदर शाह उर्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. या उर्स महोत्सवामध्ये सर्व जाती – धर्माचे लोक सहभाग घेत असल्याने हा उर्स सर्वधर्म एकात्मतेचा प्रतीक मानला जातो. या उर्स महोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. उर्स महोत्सव निमित्ताने गडचिरोली जिल्हा वासीयांसाठी मोठी जत्रा सिरोंच्या येथे भरली जाते. यावेळी संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आणि विशेष कव्वाली कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगडसह कानाकोपऱ्यातुन सर्व जाती व धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात.
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला भेट दिली आणि दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतले. त्यावेळी उर्स महोत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचं पुष्पहार देऊन स्वागत केल. त्यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तेथील भाविकांना उर्स महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या उर्स महोत्सवा निमित्ताने सुरू असलेल्या कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मस्जिद दरगहा कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…