मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या उमानूर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून उमानूर वासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
उमानूर वासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. येथील नागरिकांनी मागील वर्षी पाण्याची टाकी उभारून नळ जोडणी करण्याची मागणी केली होती. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जल जीवन मिशन अंतर्गत योजना राबविली. यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली होती.
आता गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली असून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. काम पूर्ण होताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी येथील सरपंच श्रीनिवास गावडे, मरपल्लीचे सरपंच अरुण वेलादी, रेगुलवाहीचे सरपंच ममीता नैताम, मरपल्लीचे उपसरपंच धनंजय डोंगरे, उमानूरचे उपसरपंच रवींद्र कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार तसेच उमानुर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…